Msrtc News : राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashta Budget) उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
यामध्ये एसटीमधून प्रवास (msrtc news) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला असून आज पासुन एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. शासन परिपत्रक
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.