सरकारने जाहीर केला दिवाळी बोनस

केंद्र सरकार कडून, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

यामध्ये गट क आणि ब गटातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस (Diwali Bonus) म्हणून एक महिन्याच्या पगाराएवढी रक्कम दिली जाणार आहे.

कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा?

गट B आणि C गटात मोडणाऱ्या केंद्र सरकारच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही (Non-Gazetted Employees) बोनस दिला जातो. हे असे कर्मचारी आहेत, जे कोणत्याही प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस स्कीममध्ये समाविष्ट नाहीत. केंद्रीय निमलष्करी दलातील (Paramilitary Forces) कर्मचाऱ्यांनाही Adhoc Bonus चा लाभ मिळतो. याशिवाय हंगामी कर्मचारीही याच्या कक्षेत येतात.

कसा ठरवला जातो बोनस?

कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या आधारावर कमाल मर्यादेनुसार, जी रक्कम कमी असले, त्या आधारावर बोनस जोडला जातो. 30 दिवसांचा मासिक बोनस सुमारे एक महिन्याच्या पगाराइतका असेल. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, जर एखाद्या कर्मचाऱ्याला 18000 रुपये मिळत असतील, तर त्याचा 30 दिवसांचा मासिक बोनस अंदाजे 17,763 रुपये असेल. कॅलक्युलेशननुसार, रु 7000*30/30.4 = रु. 17,763.15 (रु. 17,763).

महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या बोनसचा फायदा 31 मार्च 2023 पर्यंत सेवेत असलेल्याच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 2022-23 या वर्षात किमान सहा महिने सतत ड्युटी केली आहे. एडहॉक बेसवर नियुक्त केलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांनाही हा बोनस मिळणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांनी सलग सहा महिन्यांची सर्विस केलेली असावी, त्यांच्या सर्विसमध्ये कोणताही खंड असू नये, अशी अटकी घालण्यात आलेली आहे.

मोदी सरकारकडून बोनस जाहीर

पुढील महिन्यात दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (अॅड-हॉक बोनस) देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी (नॉन-राजपत्रित कर्मचारी), जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांनाही हा बोनस दिला जाईल. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

Diwali Bonus 2023 : मोठी बातमी! केंद्र सरकारची दिवाळी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

error: Content is protected !!