शेततळे अनुदान योजनेचा लाभा घेण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत.
शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल आणि महत्वाचं म्हणजे
अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही नियमांचे व अटींचे पालन करावे लागेल व आपण या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.
१) अर्ज करत असताना अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची कमीत कमी 60 गुंठे जमीन आवश्यक आहे.
२) यासोबतच या योजनेच्या माध्यमातून त्यांनी याअगोदर अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
३) या योजनेच्या माध्यमातून सर्वात प्रथम दिव्यांग व्यक्तींना व महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्रे..
(Important documents)
१) शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा उतारा,
२) शेतकऱ्याचा जमिनीचा ८ अ खाते उतारा,
३) रेशन कार्ड झेरॉक्स,
४) आधार कार्ड झेरॉक्स,
५) पासपोर्ट साईज फोटो,
६) यासोबतच जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे ह्या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता लागतील.