ग्रामीण भागात शेतीविषयक वादाची अनेक प्रकरण प्रलंबित असतात शेतकऱ्यांमध्ये जमीनीच्या बाबतीत शेजाऱ्यामद्ये, भवाभवांत भवकीत क्षेत्र कमी-जास्त अथवा बांधावरून जमिनीचे वाद पाहायला मिळतात, पेपर मध्ये देखील शेतीच्या वादातील बातम्या आपल्याला पाहायला मिळतात, याच वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांमधील भाऊबंदकीतील शेजाऱ्यातील वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना आखली आहे, या अंतर्गत सर्व जमिनी संदर्भातील वाद मिटवले जातील.
यासाठी आता तलाठ्याकडे करा अर्ज – जमिनीच्या ताब्यावरून वाद, शेताच्या बांधावरून होणारे वाद, शेतजमिनीवरुन होणारे वाद. अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, अतिक्रमण व वहिवाटीचे वाद, वाटणी वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किवा प्रस्ताव, तसेच अमान्यतेबाबतच्या वादाबाबत आपल्याला तलाठ्याकडे अर्ज विहित नमुन्यात त्यांच्या फॉरमॅट मध्ये किंवा हस्तलिखित अर्ज करता येतो.