ही प्रक्रिया गुणवत्तेनुसार व पारदर्शक असणार आहे. १९ मेपासून २८ मेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांना अवघे १०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. 11th addmission process 2025
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे..
- सुलभता : विद्यार्थी राज्यात कोठेही आणि मुदतीत केव्हाही अर्ज करू शकतात. त्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.
- पारदर्शकता : प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्यामुळे कोणताही पक्षपात किंवा गैरव्यवहार होणार नाही.
- वेळ, श्रम व खर्च बचत : कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची आता गरज नाही. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
- प्रणालीद्वारे मार्गदर्शन : वेबसाइटमध्ये आवश्यक माहिती, सूचना आणि सुधारणा वेळोवेळी कळविल्या जाणार आहेत.
- स्वतःचे प्राधान्यक्रम निवड : विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार किमान १० कॉलेज निवडू शकतात आणि त्यात बदलही करू शकतात.
- दस्तऐवज अपलोड सुलभ : मूळ कागदपत्रांची फोटोकॉपी घेऊन जाण्याची गरज नाही. कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करता येतात.
- एकाच पोर्टलवर सर्व माहिती : एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सोय आणि सर्व कॉलेज माहिती मिळेल. प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक व फेऱ्यांचे निकाल ऑनलाइन समजणार आहे.
- आपोआप गुणवत्ता यादी : गुणांनुसार प्रवेश निश्चित केला जाईल. त्यामुळे निकोप स्पर्धा आणि विद्यार्थ्यांना न्याय्य संधी मिळणार आहे.
जुनी वेबसाईट :
https://www.11thadmissionorg.com/
विभागीय उपसंचालक स्तरावर तांत्रिक साहाय्य व मार्गदर्शन
- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मदत
- अर्जात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन
- दाखल करण्यात येणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती
- OTP किंवा पासवर्ड विसरल्यानंतरच्या अडचणी सोडवणे
महत्त्वाचे मुद्दे :
- विद्यार्थी नोंदणी कालावधी : १९ ते २८ मे २०२५
- अधिकृत संकेतस्थळ : https://mahafyjcadmissions.in
- नोंदणी फी : १०० रुपये (संपूर्ण राज्यासाठी समान)
- प्रवेश फेऱ्या : शून्य फेरी, चार सामान्य फेऱ्या, व विशेष फेरी
- संपर्क : हेल्पलाइन : ८५३०९५५५६४ किंवा ईमेल – support@mahafyjcadmissions.in
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा