म्हाडा कोकण मंडळाच्या ४६४० घरे आणि १४ भूखंडासाठी सोडतीच्या स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध झाली. यानुसार एकूण ४९ हजार १७४ अर्ज यामध्ये पात्र ठरले आहेत.
कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ८ मार्चपासून नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली होती. स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार ४९ हजार १७४ अर्ज सोडत प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. यानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी ३५१ अर्ज, २० टक्के सर्वसमावेश योजनेसाठी ४६ हजार १६ अर्ज, म्हाडाच्या घरांसाठी २ हजार ४३८ अर्ज तर प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी ३६९ अर्ज पात्र ठरले आहेत.
👉या दिवशी होणार सोडत यादी येथे क्लिक करून पहा
प्रधानमंत्री आवास’च्या घरांना नापसंती
केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान आवास योजना’ (PMAY) अंतर्गत बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या प्रकल्पातील परवडणाऱ्या घरांना सर्वसामान्यांची पसंती मिळत नसल्याचे दिसत आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०२३च्या सोडतीतील योजनेच्या ९८४ घरांसाठी केवळ ३५२ अर्ज प्राप्त झाले तर त्यापैकी एक अर्ज अपात्र ठरल्याने ३५१ अर्ज पात्र झाले आहेत.
👉सर्व जिल्हाच्या घरकुल योजनेच्या याद्या येथे पहा
प्रथम प्राधान्य योजनेतील घरांना प्रतिसाद नाहीच
म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीत विरार, बोळींजमधील २,०४८ घरांचा समावेश असून, ही घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेद्वारे विकली जात आहेत. मात्र या घरांना इच्छुक किंवा अर्जदारांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. २,०४८ घरांसाठी केवळ ३६९ अर्ज सादर झाले आहेत.
👉या दिवशी होणार सोडत यादी येथे क्लिक करून पहा