Bank holidays सणसूद आणि बँकांचे आर्थिक व्यवहार बंद, बँकेच्या सुट्ट्या भरोशावर राहू नका. सगळ्यात मोठा सण आणि सुट्टीचे दिवस यामुळे एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची संख्या वाढणार आहे नागरिकांनी आपले आर्थिक नियोजन बँकेतील कामे चालू दिवशी करून घ्यावीत.
सप्टेंबर सुट्ट्यांचा महिना : सप्टेंबर महिना सुट्ट्यांचा ठरला आहे.
महिन्यातील तीस दिवसांत तब्बल सोळा दिवस सुट्टया असल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार बंद राहणार आहेत. त्यात गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये आल्याने बँकेच्या ग्राहकांना आणि गणेशभक्तांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल १६ दिवस बँकांना सुटी मिळणार असल्याने लोकांनी बँकांतील आपापली कामे सुट्टीचे दिवस बघून करून घ्यावी लागणार आहेत.
बँकेच्या सुट्ट्यांची यादी पहा
सप्टेंबर महिन्यात ४ रविवार आणि २ शनिवार मिळून एकूण ६ दिवस नियमित सुटी आहे. त्याशिवाय विविध कारणांनी १० दिवस बँका बंद राहणार आहेत. सप्टेंबर या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. यात शनिवार आणि रविवारचा समावेश आहे. एवढे दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील २००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख दिली आहे. त्याचाही विचार ग्राहकांनी करायला हवा. bank holidays
गैरसोय होऊ नये म्हणून लोकांनी बँकांच्या सुट्ट्यांची दखल घेऊन कामकाज चालू असलेल्या दिवशीच आपली कामे करावीत आणि होणारी गैरसोय टाळावी. एटीएमच्या भरोशावर राहू नका. सगळ्यात मोठा सण आणि सुट्टीचे दिवस यामुळे एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची संख्या गर्दी वाढणार आहे. साहजिकच एटीएममधील पैशांचा तुटवडा देखील भासू शकतो. त्यामुळे ती शक्यता गृहीत धरूनच अगोदर ग्राहकांनी आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे.