सप्टेंबर महिन्यात ४ रविवार आणि २ शनिवार मिळून एकूण ६ दिवस नियमित सुटी आहे. त्याशिवाय विविध कारणांनी १० दिवस बँका बंद राहणार आहेत. ३, ६, ७, ९,१०,१७,१८,१९, २०, २२, २३, २४, २५, २७, २८ आणि २९ सप्टेंबर या दिवशी बँकांना सुटी असणार आहे. यात शनिवार आणि रविवारचा समावेश आहे. एवढे दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील २००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख दिली आहे. त्याचाही विचार ग्राहकांनी करायला हवा आपली कामे बँकेच्या कामकाजाच्या दिवशी करून घ्यावीत.