Maharashtra Cabinet Expansion Latest Updates
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर मध्यरात्री बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होताच भावी मंत्र्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. (Latest Marathi News)
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप हा महायुती सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक मंत्रिपदं भाजपच्या वाट्याला येणार आहे. याशिवाय शिंदे गट आणि अजित पवार गटाला समान मंत्रिपदाचे (Maharashtra Cabinet Expansion) वाटप केले जाणार आहे. महामंडळातील खातेवाटपात सुद्धा हाच फॉर्म्यूला वापरला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
मंत्री पदासाठी कुणाची लागणार वर्णी येथे क्लिक करून पाहा
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय पहिल्या दोन्ही पक्षातील प्रत्येकी ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
दरम्यान, तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्याच नजरा लागून होत्या. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर भाजपकडून सुद्धा अनेक आमदार मंत्रिपदाच्या आशेवर आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.