land record: नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध सरकारी योजना, शासकीय निमशासकीय नोकरी याविषयी माहिती देत असतो. आज आपण अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे जमिनीची खरेदी विक्री करत असताना, त्या जमिनीचा इतिहास आपल्याला महिती असणं अत्यंत आवश्यक असतं, त्यासाठी आपल्याला सातबारा खाते उतारे सीटी सर्व्हे पहावे लागतात. शेतकऱ्याला शेतीविषयक योजना कर्ज शेतीसाठी कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीचे रेकॉर्ड म्हणजेच सातबारा आठ-अ गरजेचा असतो. काहीवेळा फेरफार देखील गरज लागते त्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही. तर आपल्या जमिनीचा सातबारा आठ-अ, नवीन, जुने रेकॉर्ड, फेरफार ऑनलाईन कसे पाहायचे या विषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जमिनीचे प्लॉटचे 7/12, सीटी सर्व्हे गट नंबर,नाव टाकून येथे पहा ऑनलाईन
मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे, शेतकरी बांधवाना सातबारा हि वेळोवेळी लागणारं कागदपत्रं आहे, शेतकरी आणि सातबारा हे खुप जवळचं नातं आहे, मग उदा तुमचं पीक कर्ज असो, पीक विमा, सरकारी कोणत्याही योजना ज्या कि शेतीविषयी आहेत त्यासाठी सातबारा आवश्य लागतो, अशावेळी धावपळही होते, आता मात्र सातबारा आपल्या मोबाईल वर कसा पाहायचा आणि तो डाऊनलोड करून सेव्हही करून ठेवता येतो. खालील वेबसाईट लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे किंवा इतर कोणाचेही जमीनचे रेकॉर्ड फेरफार सातबारा आठ-अ पाहू शकता.
जमिनीचे नकाशा रेकॉर्ड गट नंबर टाकून पहा ऑनलाईन
ऐनवेळी गरज भासल्यास आपण पाहिजे तेंव्हा आपल्या मोबाईल मधील सातबारा छायांकित प्रतीत (प्रिंट) काढून पाहिजे तेथे योग्य ठिकाणी दाखल करू शकतोत, यामुळे आपली ऐनवेळेची धावपळ ही होणार नाही, वेळेवर आपले काम देखील मार्गी लगेल. आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा सातबारा असल्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि सातबाऱ्यासाठी तुमची पळापळ, परेशानी देखील होणार नाही.
जमिनीचे प्लॉटचे 7/12, सीटी सर्व्हे गट नंबर,नाव टाकून येथे पहा ऑनलाईन