Pik Vima: बळीराजाची यंदाची दिवाळी होणार गोड होणार; राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी अग्रीम पीकविमा मंजूर यादी पहा
त्यामुळे पीकविम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. crop insurance
एकट्या बीड जिल्ह्यात ७ लाख ७० हजार अर्जदारांसाठी २४१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आली आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सरकारने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, तसेच पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली.
हेही वाचा: Pik vima: ८५०१ गावांची पैसेवारी जाहीर यादी पहा
पण, पीकविमा कंपनीने सरसकट विमा देण्यास हरकत घेतली. इतकंच नाही तर पीकविमा कंपन्यांनी आधी विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सरसकट विमा देण्यास हरकतीचे अपील केले होते. हे दोन्हीही अपील संबंधित यंत्रणांनी फेटाळून लावले.
यादीत नाव पहा
अखेर भारतीय पीकविमा कंपनीने आपले आक्षेप मागे घेतले असून, राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी १७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: Crop Insurance सरसकट पिक विमा जाहीर.! जिल्हा निहाय यादी पहा