Viral Video हुल्लडबाजी आली अंगलट, अख्खं कुटुंब भुशी धरणात वाहून गेलं व्हिडिओ वायरल पहा

Pune Bhusi Dam Monsoon Trip :पावसाळी सहलीसाठी (Monsoon Trip) लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलं असून शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, हे अख्खं कुटुंब वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

 

Video Viral रस्त्यावर एवढे पाणी गाडी गेली वाहून पहा व्हिडिओ वायरल

 

धबधब्यातून भुशी धरणात वाहून गेलेलं अख्खं कुटुंब

भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले आहेत. यामध्ये लहान मुलं-महिलांचा समावेश आहे. पाच जणांमधील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत, इतर तिघांचं शोधकार्य सुरु आहेत. सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉलमधून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले

भुशी धरणाच्या मागील धबधबा, रेल्वे वॉटर फॉल म्हणून ओळखला जातो. या धबधब्याचं पाणी पाणी भुशी धरणात येते. या धबधब्यात पाण्याचा अंदाज न आल्याने अख्खं कुटुंब वाहुन गेलं आहे.

वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुशी धरण परिसरात आलेले पर्यटक धरणाच्या पात्रात बुडाले. बुडालेल्या व्यक्तींची नावे साहिस्ता लियाकत अन्सारी (वय 36 वर्ष), अमिमा आदिल अन्सारी (वय 13 वर्ष), उमेश आदिल अन्सारी (वय 8 वर्ष), अदनान सबाहत अन्सारी (वय 4 वर्ष) आणि मारिया अकील सय्यद (वय 9 वर्ष) अशी आहेत. यापैकी साहिस्ता, अमिमा आणि उमेश यांचा मृत्यू झाला असून त्याचे मृतदेह सापडले आहेत. तर, बुडालेल्या इतर दोघांचा शोध सुरु आहे.

पाहा व्हिडीओ –

 

 

मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, व्हिडिओ पहा लहान मुलं-महिलांचा समावेश.

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!