Monsoon Rain News : राज्यातील अनेक ठिकाणी मागील २ दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. आज सकाळपासूनच बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत होता. हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज दिला.
तर गुरुवापासून पाऊस काहीसा कमी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
Maharashtra Rain : बीडमध्ये पावसाचा जोर अधिक
उद्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असला तर कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
Maharashtra rain update
गुरुवारपासून राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असला तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
Maharashtra Rain: मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस
राज्यातील अनेक भागात मागील २ दिवसांमध्ये चांगला पाऊस पडला. विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यात तब्बल २८ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. कोकणालाही पावसाने चांगलेच झोडपले. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्येही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार सरी बरसल्या. नगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावत सात महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 2मिनिटांत येथे करा ऑनलाईन अर्ज