Joy Hydrogen Scooter : इंधनाच्या वाढत्या महागाई वर पर्याय म्हणून बाजारात बदल होताना दिसत आहेत.

पेट्रोल, CNG, इलेक्ट्रिक नंतर आता चक्क आता पाण्यावर चालणारी दुचाकी स्कुटर बाजारात

पेट्रोलच्या किंमती दिवसागणिक वाढल्या. आता इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना आला आहे. तर बजाजने फ्रीडम 125 ही सीएनजी बाईक बाजारात उतरवली आहे. पण आता पाण्यावर चालणारे स्कूटर बाजारात आले आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

तुम्ही म्हणाले हे कसं शक्य आहे? पण ही किमया केली आहे ती एका भारतीय कंपनीने. Joy e-bike ने पाण्यावर चालणारी स्कूटर आणली आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत मिळेल.

काय आहे हे तंत्रज्ञान

जॉय ई-बाईकची कंपनी वार्डविझार्डने हे काम केले आहे. हायड्रोजन फ्यूल सेल आणि इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञानावर काम करत कंपनीने पाण्यावर चालणारे स्कूटर आणले आहे. हायड्रोजन तंत्रज्ञान भारतात स्वच्छ इंधनासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी मदत होते.

पाण्यावर चालणार स्कूटर

जॉय ई-बाईकने या वर्षात भारतात मोबिलिटी शोमध्ये पाण्यावर चालणारे स्कूटर सादर केले आहे. हे स्कूटर डिस्टिल्ड वॉटरवर धावते. या वाहनांचं तंत्रज्ञान पाण्यातील मॉलिक्यूल्स वेगळे करुन हायड्रोजन तयार होते. त्याचा वापर स्कूटरमध्ये इंधन म्हणून करण्यात येते. त्या इंधनावर हे स्कूटर धावते.

चारचाकी घेण्याचा विचार करत असाल तर पहा स्वस्तात SUV मायलेज आणि फीचर्सही जबरदस्त

वाहन परवान्याची नाही गरज

पाण्यावर चालणाऱ्या स्कूटरची गती तशी एकदम जास्त नाही. या स्कूटरची टॉप स्पीड प्रति तास 25 किलोमीटर अशी आहे. या स्कूटरची गती कमी आहे. हे स्कूटर चालवण्यासाठी वाहन परवान्याची गरज नाही. विना ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही ही स्कूटर चालवू शकतात. अनेक ऑटोमोबाईल कंपन्या हायड्रोजनवर चालणारी वाहनं आणण्यावर भर देत आहेत.

150 किमीचे मायलेज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर एक लिटर डिस्टिल्ड वॉटरमध्ये 150 किलोमीटरचे अंतर कापण्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या या ई-स्कूटरची चर्चा सुरु आहे. त्याचे प्रोटोटाईप आले आहे. म्हणजे अजून ही स्कूटर विक्रीसाठी आली नाही. या तंत्रज्ञानावर अजून काम सुरु आहे. कंपनी त्यावर काम करत आहे. जेव्हा हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसीत होईल, तेव्हा ही स्कूटर बाजारात दाखल होईल.

शेतकऱ्यांना मोफत वीज तर वीजबिलही होणार माफ शासन निर्णय आला पहा

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!