साधारणत: 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
दुसरीकडे पुण्यातही पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.