Rain alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jayakwadi Dam News : मराठवाड्यासाठी आनंदवार्ता, जायकवाडी धरण काठोकाठ भरलं, पाहा VIDEO

भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या दाबाला लागूनच जवळपास ७ किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. काल म्हणजेच शनिवारी (ता.७ ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

दुसरीकडे राज्यातल अनेक ठिकाणी सध्या तापमानाचा पारा ३० अंशाच्या वरच गेला आहे. एकीकडे ऊन आणि सावल्यांचा हा खेळ सुरू असताना दुसरीकडे तुरळक ठिकाणी पाऊस देखील झालाय. आज वातावरणात पुन्हा बदल होऊन जोरदार पावसाची शक्यता (Rain Alert Today) वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जाहीर करण्यात आलाय.

 

कापुस सोयाबीन मदतीचा नवीन GR प्रसिद्ध येथे पहा

 

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात कोसळणार पाऊस

  • आज शनिवारी पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.
  • कोकणासह नाशिक तसेच कोल्हापूरचा घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
  • पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
  • उर्वरित विदर्भात शनिवारी, रविवारी दिवसभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
  • मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
  • उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव तसेच नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय.
  • कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील आज पावसाची शक्यता आहे.
  • विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.

Weather Alert : बाप्पाच्या आगमन पाऊस धुमाकूळ घालणार; राज्यातील १४ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट

 

अधिक माहितीसाठी येथे पहा

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!