Ladki bahin yojana महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. दरम्यान तिसऱ्या महिन्याचे अनुदान हे २९ सप्टेंबर रोजी दिले जाणार आहे.
आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
Ladki Bahin Yojana : सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल दोन लाख ३१ हजार २९४ नवीन महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र, आतापर्यंत अनेक महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्याने हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर बँक अकाउंट आणि आधार नंबर लिंक करावेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ३००० रुपये मिळाले होते. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ४५०० रुपये मिळणार आहेत, असं सांगण्यात येत आहे. (Ladki Bahin Yojana 3rd Installment)
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत? ‘हे’ काम लगेच करा
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही कसं चेक कराल?