सणासुदीत ९.४ कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट! PM किसान निधीचा १८ वा हप्ता बँक खात्यात जमा
सणासुदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी (दि.५) शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. त्यांनी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM kisan 18th Installment) योजनेचा १८ वा हप्ता आज जारी केला.
पीएम मोदी आज वाशीम दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पोहरादेवीचे दर्शन घेत पूजा केली. तसेच त्यांनी आज येथील सभेला संबोधित केले. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
#WATCH | Maharashtra: Prime Minister Narendra Modi launches several initiatives related to the agricultural and animal husbandry sector worth around Rs 23,300 crores in Washim. pic.twitter.com/xp7245shFm
— ANI (@ANI) October 5, 2024
PM Kisan Yojana : नाव नोंद कशी पाहावी?
- अधिकृत PM-KISAN वेबसाइटला भेट द्यावी.
- लाभार्थी यादी पेजवर जावे.
- राज्य, जिल्हा, उपजिल्हा, विभाग आणि गाव कोणते? ही माहिती नोंदवा.
- लाभार्थी नावाची यादी शोधण्यासाठी ‘Get Report’ निवडा.
शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य
पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर खाली दिलेल्या पर्यायांद्वारे ई-केवायसी करून घ्या.
पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये सुमारे २३,३०० कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.
या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा यादीत नाव पहा