Ladki Bahin Yojana Last Date Extended: महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेल्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. Aditi tatkare
👇🏻👇🏻👇🏻
लाडकी बहिण योजनेचे पैसे अजून आले नाहीत; आता करा हे काम? लगेच हफ्ता खात्यावर जमा होणार
तिसऱ्यांदा वाढवली मुदत
लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी आधी १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून ३१ ऑगस्ट केली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून ३० सप्टेंबर केली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवते १५ ऑक्टोंबर करण्यात आली आहे.
योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवीत
- आधार कार्ड
- अधिवात/जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराने हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
योजनेच्या लाभासाठी या आहेत अटी
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करु शकतील.
- आधी लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता. नवीन बदलानुसार तो 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आले आहे.
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा