मुंबई: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. दरम्यान आता भाजपकडून २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Vidhansabha election 2024 list याआधी भाजपने जवळपास १२१ उमेदवारांची नावे दोन याद्या प्रसिद्ध करून जाहीर केली आहेत. दरम्यान तिसऱ्या यादीतून २५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपने तिसऱ्या यादीत कुणाकुणाला उमेदवारी जाहीर केली आहे ते, जाणून घेऊयात.

भारती लवकेर यांना पुन्हा एकदा वर्सोवा येथून तिकीट देण्यात आले आहे. तर किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्यांदा भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर त्यानंतर २२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने १४६ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर लोकसभेत पराभूत झालेल्या राम सातपुते यांना पक्षाने पुन्हा एकदा माळशिरसमधून उमेदवारी दिली आहे.

भाजपच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार

१. हरिश पिंपळे – मूर्तीजापूर
२. सई डहाके – कारंजा
३. राजेश वानखेडे – तेवसा
४. उमेश यावलकर – मोरशी
५. सुमित वानखेडे- आरवी
६. चरणसिंग ठाकूर – कटोल
७. आशीष देशमुख – सावनेर
८. प्रवीण दटके – नागपूर मध्य
९. सुधाकर कोहले – नागपूर पश्चिम
१०. मिलिंद माने – नागपूर उत्तर
११. अविनाश ब्राम्हणकर – साकोली
१२. किशोर जोरगेवार – चंद्रपूर

 

Vidhansabha election 2024 list

१३. राजू तोडसाम – आरणी
१४. किशन वानखेडे – उमरखेड
१५. जितेश अंतपूरकर – देगलूर
१६. विनोद मेढा – डहाणू
१७. स्नेहा दुबे – वसई
१८. संजय उपाध्याय – बोरिवली
१९. भारती लवकेर – वर्सोवा
२०. पराग शाह – घाटकोपर पूर्व
२१. सुरेश धस – आष्टी
२२. अर्चना चाकुरकर – लातूर शहर
२३. राम सातपुते – माळशिरस
२४. मनोज घोरपडे – कराड उत्तर
२५. संग्राम देशमुख – पलूस कडेगाव

महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. शिवसेनेशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या महाआघाडीत समावेश आहे. दुसरीकडे, विरोधी आघाडी एम.व्ही.ए. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी), ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल बोलायचे तर, भाजपने 165 उमेदवार उभे केले होते आणि 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला होता.

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!