Mahadbt Farmer List : महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाईन
यादीत नाव पाहा
अशा सोप्या पद्धतीने पहा ऑनलाईन यादी.
सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवरआल्यानंतर लॉगिन करायचा आहे.
लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला अर्जाची सद्यस्थिती तपासा, लॉटरी यादी आणि निधी वितरित लाभार्थी यादी असे तीन पर्याय दिसून येतील.
ज्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचा वितरण झालेला आहे, जे लाभार्थी योजनेचे अंतर्गत पात्र आहेत.
अशा लाभार्थ्यांची यादी देखील पाहता येते, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काही पर्याय दिसणार आहेत.
यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा निवडण्याचा पर्याय आहे.
आपला जिल्हा निवडून त्यानंतर तालुका, गाव निवड करायचा आहे.
गाव निवडल्यानंतर आपल्या गावाची यादी रिफ्लेक्ट होईल, यातून आपले गाव निवडायचे आहे.
समजा गाव निवडल्यानंतर यामध्ये किती लाभार्थी पात्र आहेत? याची मागील काही वर्षांची यादी आपल्याला पाहता येईल.
तसेच सर्वात शेवटी 2024 25 या वर्षातील देखील लाभार्थी पात्र झालेले शेतकरी त्यांचीही नाव आपल्याला पाहता येतील.
किती तारखेला अनुदान क्रेडिट झाला आहे? शिवाय कुठल्या बाबीसाठी हे अनुदान मिळाला आहे, ही माहिती देखील नमूद करण्यात आलेली दिसून येईल.
यादीत नाव पाहा