Viral Video : “अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेल तर..” तरुणाची पाटी चर्चेत, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण हातात पाटी घेऊन उभे आहे आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना महाराष्ट्र दिनाच्या हटके शुभेच्छा देत आहे. या पाटीवर त्यांनी एक सुंदर संदेश लिहिला आहे. या संदेशातून महाराष्ट्राविषयी व मराठी भाषेविषयी प्रेम दिसून येते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
वायरल व्हिडिओ येथे पाहा
या तरुणांनी या पाटीवर सुंदर संदेश लिहिला आहे. त्यांनी लिहिलेय, “अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेन तर आपल्याला हिंदी शिकण्याची गरज नाही तर देशाला मराठी शिकण्याची गरज आहे. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
वायरल व्हिडिओ येथे पाहा
posterwala_ganyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” जय महाराष्ट्र, जय शिवराय ,जय शंभूराजे जय महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र जय महाराष्ट्र” तर एका युजरने लिहिलेय, “जगात भारी आमची मराठी” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..” अनेक युजर्सनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
वायरल व्हिडिओ येथे पाहा