MahaDBT Farmer Lottery List : महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडत यादी जाहीर झाली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना मॅसेज करण्यात आले आहेत. यासाठी सात दिवसांच्या कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (Mechanization Lottery List) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी अर्ज मागविण्यात आले होते. या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टलद्वारे सोडत काढण्यात आली आहे. या सोडत यादीमध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 

महाडीबीटी सोडत यादीमध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे, त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्तिचे आरसी बूक अपलोड करावे लागते. त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत.

 

महाडिबीटी यादीत नाव पाहा 

 

अशी पहा जिल्हानिहाय यादी 

सर्वप्रथम महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/FundDisbursedReport पोर्टलला भेट द्या. या ठिकाणी निधी वितरित लाभार्थी यादी हा पर्याय निवडा. आपण वास्तव्यास असलेल्या जिल्ह्याची निवड करून तालुका आणि गाव निवडा. यानंतर आपल्यासमोर आपल्या गावाची यादी पाहायला मिळेल. शिवाय आपले नावही तपासता येईल.

 

महाडिबीटी यादीत नाव पाहा 

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!