स्टेप्स अन् हावभाव सगळंच हटके… शिक्षिकेचा विद्यार्थिनींसह ‘घर मोरे परदेसिया’,गाण्यावर तुफान डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थिनींबरोबर ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय.

Viral Video: आजकालच्या शालेय शिक्षणात आणि पूर्वीच्या शालेय शिक्षणात जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. केवळ शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही मोठा फरक पाहायला मिळतो. पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे. परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात. अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात केवळ मुलांनी अभ्यास करून यश मिळवावं हाच हेतू असायचा. परंतु, बदलत्या काळानुसार आता शाळेत मुलांचे छंद, कला, आवड-निवड या सर्व गोष्टींकडेही लक्ष दिले जाते. त्यामुळे अनेकदा शिक्षकही वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर नाचताना, गाणी गाताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा

 

आजकाल सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान चर्चेत येईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवितानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता शाळेतील असा एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षिका विद्यार्थिनींबरोबर डान्स करताना दिसतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थिनींबरोबर ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी त्यांच्या सर्व डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव तुमचेही लक्ष वेधून घेतील. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ:

 

संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा

 

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!