Devendra Fadnavis: शेतकऱ्यांनो लगेच बँक खाते तपासा, केंद्रानंतर राज्य सरकारकडून दोन हजार रुपये जमा.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे जमा केल्यानंतर आता राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यातील ९१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली असून, शेतकऱ्यांनी आपले खाते तपासण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार
नमो शेतकरी हप्त्याचे स्टेट्स येथे तपासा
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे ही योजना?
महाराष्ट्रातील शेतकरी अनेकदा दुष्काळ, अतिवृष्टी आणि आर्थिक अडचणींना सामोरे जातात. अशा परिस्थितीत नमो शेतकरी योजना त्यांच्यासाठी आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना बियाणे, खते, आणि इतर शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी उपयोगी पडते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते योजनेशी जोडलेले असल्याची खात्री करावी. जर कोणाला याबाबत अडचण येत असेल, तर स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती मिळवता येईल.
नमो शेतकरी हप्त्याचे स्टेट्स येथे तपासा