Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’मुळे महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता या योजनेतून राज्यातील सुमारे सव्वा लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.

सरकारच्या निर्णयामुळे अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. लाखो लाडक्या बहिणींना सरकारने मोठा झटका दिला आहे. अपात्र महिलांची मोठी यादी जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. खोटी माहिती, बनावट दस्तऐवज आणि नियमभंग केल्यामुळे प्रशासनाने मोठा सर्व्हे करून एकाच झटक्यात लाखो महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

 

गावनिहाय अपात्र यादीत नाव पाहा

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. परंतु या योजनेत अनेक महिलांनी वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि अन्य अटींचा भंग करत अनधिकृत लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू केलं. यासाठी तब्बल 6-7 लाख अंगणवाडी सेविकांना कामाला लावण्यात आलं. त्यांनी गावागावात, घराघरात जाऊन लाभार्थी महिलांची माहिती गोळा केली आणि लबाड लाडक्या बहीणींचा शोध घेवून त्यांना थेट अपात्र ठरवण्यात आलं आहे.

पहिल्या टप्प्यात 65 वर्षांपेक्षा जास्त आणि 21 वर्षांखालील महिलांनी लाभ घेतला आहे का, याची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात एकूण 1,33,335 अर्ज तपासण्यात आले. त्यापैकी 93,007 अर्ज पात्र तर 40228 अर्ज अपात्र ठरले. हे सर्वेक्षण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं. त्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरातून जास्तीत जास्त दोन महिलांनीच लाभ घ्यावा, हा नियम तपासण्यात आला. यासाठी एकूण 409072 अर्ज तपासण्यात आले. 324363 अर्ज पात्र तर 84709 अर्ज अपात्र ठरले.

 

गावनिहाय अपात्र यादीत नाव पाहा

 

सुमारे 1 लाख 25 हजार महिलांना वगळलं

या दोन्ही टप्प्यांत मिळून 124937 महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. जिल्हा व महिला बालविकास अधिकारी गणेश पुंगळे यांनी ही माहिती दिली आहे. संबंधित माहिती शासनाला सादर करण्यात आली असून, अधिकृत आकडेवारीनुसार ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

लाडक्या बहिणी संतापल्या..

प्रशासनाच्या या निर्णयामुळे अपात्र ठरलेल्या महिलांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. नावे अचानक योजनेतून वगळण्यात आली, त्या सध्या महिला व बाल विकास कार्यालयांच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारत आहेत. आम्हाला योजनेतून नाव वगळण्यात येणार आहे, याची कुठलीही पूर्वसूचना दिली नाही, असा आरोप अनेक महिलांनी केला आहे.

कोणत्या कारणांमुळे महिलांना अपात्र ठरवलं जातंय?

  • वयोमर्यादेचं उल्लंघन.(21 वर्षाखालील किंवा 60 पेक्षा जास्त)
  • बनावट दस्ताऐवज किंवा चुकीची माहिती.
  • एका घरातून 3 किंवा त्याहून अधिक महिलांनी लाभ घेणे.
  • अन्य योजनांचा लाभ घेऊनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज.

दरम्यान, राज्य सरकारकडून योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणखी टप्पेवार पडताळणी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांना शासनाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे, परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्रं आणि पुरावे सादर करावे लागणार आहेत.

तुमचं नाव अपात्र यादीत आलंय का, कसं चेक करणार?

अधिकृत माहिती मिळवण्यासाठी तुमच्या तालुका महिला बालविकास कार्यालयाशी संपर्क करू शकतात. aaplesarkar.mahaonline.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासू शकतात. चुकीच्या पद्धतीने ठरवण्यात आलं असे तर तुम्ही पुनरपरीक्षणासाठी अर्ज करू शकतात.

 

गावनिहाय पात्र यादीत नाव पाहा

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!