Police recruitment 2025 राज्यात १५ हजार ६३१ पोलिस शिपायांची पदभरती होणार आहे. त्यात सोलापूर ग्रामीणमधील ९०, सोलापूर शहर पोलिसांकडील ९६ आणि राज्य राखीव पोलिस बल व कारागृह शिपाई यांची सुमारे ५५ पदे आहेत. 
उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी २९ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. Police recruitment 2025
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात रिक्त होणारी पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्डसमन, सशस्त्र पोलिस शिपाई व कारागृह शिपाई, अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती. पण, अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नव्हती. त्यासंदर्भात २५ ऑक्टोबरच्या अंकात सकाळने ‘आचारसंहितेत अडकणार पोलिस भरती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने आचारसंहितेची शक्यता गृहित धरून पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 
 
 
उद्यापासून (ता. २९) उमेदवारांना पोलिस भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, एका पदासाठी उमेदवारास एकाच जिल्ह्यात एकमेव अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केल्यास ते अर्ज बाद ठरणार आहेत. मैदानी चाचणीत उत्तीर्ण (किमान ४० टक्के गुण आवश्यक) ठरलेल्यांमधून एका पदासाठी दहा जणांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेच्या मेरिटनुसार उमेदवारांची पोलिस पदांसाठी निवड होणार आहे. Police recruitment 2025 
राज्यातील पोलिसांची रिक्तपदे 
पोलिस शिपाई : १२,३९९  
चालक शिपाई : २३४  
सशस्त्र पोलिस शिपाई : २,३९३  
कारागृह शिपाई : ५८०  
बॅण्डसमन : २५  
एकूण : १५,६३१  
‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज 
पोलिस भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी policerecruitment 2025.mahait.org  हे संकेतस्थळ उपलब्ध असणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ४५० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपयांचे परीक्षा शुल्क असणार आहे.
 
 
        
        
                            
                        
	
		Post navigation