Agriculture Land : भोगवटादार वर्ग-2 जमिनीची विक्री करता येते का? नियम, कायदा काय सांगतो? जाणून घ्या सविस्तर

Agriculture Law : शेतकरी आणि जमीनधारकांसाठी सातबारा उताऱ्यावर नमूद असलेली माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते.विशेषतः भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींच्या व्यवहाराबाबत अनेकांना संभ्रम असतो. या जमिनींच्या कायदेशीर अटी, निर्बंध आणि हस्तांतरण प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घ्या.

 

महाराष्ट्रातील मुख्य भूधारणा प्रकार

भोगवटादार वर्ग-1 – कोणतेही सरकारी निर्बंध नसलेली जमीन, स्वतंत्र व्यवहार करता येतो.

भोगवटादार वर्ग-2 – शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरण करता येत नाही. शासकीय पट्टेदार जमीन – ठरावीक कालावधीसाठी भाडेपट्टीवर दिलेली जमीन. महाराष्ट्र शासनाची जमीन – पूर्णपणे सरकारी ताब्यात असलेली जमीन.

 

भोगवटादार वर्ग-2 मधील 16 प्रकारच्या जमिनी

मुंबई कुळ कायदा 1948 अंतर्गत मिळालेल्या जमिनी – विक्रीस निर्बंध. शासनाने भूमीहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी – विक्री करता येत नाही. गृह निर्माण संस्था व उद्योगांसाठी दिलेल्या जमिनी – मर्यादित व्यवहार. सिलिंग कायद्यानुसार पुनर्वाटप केलेल्या जमिनी – खाजगी विक्रीस बंदी. महानगरपालिका, ग्रामपंचायत राखीव जमिनी – सार्वजनिक उपयोगासाठी राखीव.देवस्थान इनाम जमिनी – केवळ धार्मिक कारणांसाठी वापरता येतात. आदिवासी खातेदारांच्या जमिनी – केवळ आदिवासींनाच हस्तांतर करता येते. पुनर्वसन योजनेअंतर्गत दिलेल्या जमिनी – खाजगी विक्री करता येत नाही. भाडेपट्टीवर दिलेल्या शासकीय जमिनी – ठरावीक कराराच्या अधीन.

 

भूदान व ग्रामदान जमिनी – स्वतंत्र विक्रीस बंदी. खाजगी वन संपादन कायद्यानुसार प्रलंबित जमिनी – व्यवहारांवर निर्बंध. भूमीधारी हक्कानुसार मिळालेल्या जमिनी – खास अटी लागू. सिलिंग कायद्यानुसार जास्तीच्या जमिनी – सरकारच्या ताब्यातच राहतात. भूसंपादन कायद्यानुसार संपादित जमिनी – खाजगी विक्रीस बंदी. वक्फ जमिनी – मुस्लिम संस्थांसाठी राखीव, स्वतंत्र विक्री करता येत नाही.

कोणत्या जमिनी वर्ग-1 मध्ये बदलता येत नाहीत?

सिलिंग कायद्यांतर्गत जप्त जमिनी, महानगरपालिकांच्या विकास आराखड्यातील जमिनी,

देवस्थान इनाम जमिनी,आदिवासी खातेदारांच्या जमिनी ,खाजगी वन संपादन कायद्यांतर्गत जमिनी

वक्फ बोर्डाच्या जमिनी ,भूसंपादन कायद्याने संपादित केलेल्या जमिनी

जमीन विकता येते का?

तुम्ही सातबारा उताऱ्यावरून जमीन वर्गीकरण तपासा. तसेच ती विकण्यासाठी शासकीय परवानगी लागेल का? हे महसूल विभागाकडून स्पष्ट करून घ्या. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घ्या.

 

वडिलोपार्जित जमिनीवर कोणाकोणाचा हक्क असतो जाणून घ्या कायदा काय सांगतो जाणून घ्या

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!