शेतरस्ता म्हणजे काय?
शेतरस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत जाणारा अधिकृत रस्ता असतो. या रस्त्याद्वारे शेतीकामांसाठी यंत्रसामग्री, पाणी, मालवाहतूक सहज शक्य होते. शेतरस्त्याची नोंद 7/12 उताऱ्यावर होते आणि यामुळे शेतीसाठी मालमत्ता हक्क स्पष्ट होतो.
मागणी करण्याची प्रक्रिया
जमिनीचे जुने सातबारा, आठ-अ रेकॉर्ड असे पाहा ऑनलाईन
प्राथमिक अर्ज
शेतकरी किंवा शेतमालकाने आपल्याला शेताकडे जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे, हे नमूद करून तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज द्यावा लागतो. अर्जात शेताचा सर्वे नंबर, गट नंबर, रस्ता कुठून हवा आहे, त्याची लांबी, रुंदी याची माहिती नमूद केली पाहिजे. याऊपर सदर अशयाचा अर्ज तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे सादर करावा. त्यानंतर सर्व माहिती घेऊन शहानिशा करून आपण केलेला अर्ज निकाली काढण्यात येईल.
राज्य सरकारचा मोठा निर्णय आता स्टॅम्प ड्युटी होणार माफ काय आहे निर्णय? जाणून घ्या