AIR India: एअर इंडियात १० वी, १२ वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून लवकरात लवकर उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
एअर इंडियातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील अधिसूचना एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘Air India Air Transport Services Limited‘ (AIASL) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर हँडीमॅन आणि युटिलिटी एजंटच्या ९९८ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. यात रिक्त असलेल्या ९९८ पदांपैकी ९७१ जागा हँडीमनसाठी, २० युटिलिटी एजंट (पुरुष) आणि ७ युटिलिटी एजंट (महिला) साठी आहेत.
सविस्तर जाहिरात येथे पहा
वरील रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. १८ सप्टेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. तसेच, अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार अतिरिक्त पात्रतेसह एसएससी/१० वी पाससह आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.