Astro Tips Nail Cutting: धार्मिक ज्योतिषशास्त्रात नखे कापण्याचा दिवस

सामान्य माहितीनुसार आठवड्याच्या दिवसांनुसार नखे कापण्याचे परिणाम:
सोमवार 
सोमवारी नखे कापणे शुभ मानले जाते. हा दिवस महादेव आणि चंद्राशी संबंधित असल्याने मन शांत राहते.

 

मंगळवार
मंगळवारी नखे कापणे टाळावे. मात्र काही लोकांच्या म्हणण्यानुसार यामुळे कर्जमुक्ती होते. हनुमानासाठी उपास करणाऱ्यांनी या दिवशी नखे कापणे टाळावे.

 

बुधवार 
बुधवारी हा दिवस नखे कापण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये यश आणि व्यवसायात वाढ होते.

 

गुरुवार 
गुरुवारी काही मतांनुसार नखे कापू नयेत असे अनेकदा ऐकायला मिळते, पण यामुळे सत्त्वगुण वाढतो असेही मानले जाते.

 

हे ही वाचा: शनीच्या प्रभावापासून सुटका हवी आहे? ‘या’ 5 मंदिरांना भेट द्या अन् साडेसातीपासून मिळवा मुक्ती!

 

शुक्रवार 
शुक्रवारी हा नखे कापण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. देवी लक्ष्मी प्रसन्न होते, संपत्ती आणि सौंदर्य वाढते, नातेसंबंध अधिक दृढ होतात.

 

शनिवार 
शनिवारी नखे कापणे अशुभ मानले जाते. यामुळे शनीचा कोप होतो आणि आरोग्य, मन:शांती आणि आर्थिक नुकसान संभवते.

 

रविवार 
रविवारी नखे किंवा केस कापू नयेत. आत्मविश्वास कमी होतो, यशात अडथळे येतात आणि आरोग्य बिघडते.

 

योग्य दिवशी नखे कापल्यास केवळ आरोग्यच नव्हे तर आर्थिक आणि मानसिक फायदेही मिळू शकतात.

 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘महा न्युज २४’ याची खातरजमा करत नाही.)

 

Home

error: Content is protected !!