Bajaj Chetak कडून ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत २२ हजारांची कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि ऍडव्हान्स फीचर्स
भारतात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी वाढली आहे. अशातच अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बजाजने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत कपात केली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारडून फेम-२ ही सबसिडी दिली जाते. परंतु, अलिकडेच या सबसिडीत सरकारने कपात केली आहे. परिणामी इलेक्ट्रिक वाहनं महागली आहेत. असं असलं तरी इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करायचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.
बजाज ऑटोने त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतकच्या किंमतीत २२ हजार रुपयांची कपात केली आहे. आता या स्कूटरची सुरुवातीची किंमत १.३० लाख रुपये इतकी आहे. यापूर्वी बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १.५२ लाख रुपये इतकी होती.
Bajaj चेतक ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती
दरम्यान, बजाज कंपनीने या स्कूटरचं बेस व्हेरिएंट बंद केलं आहे. या स्कूटरच्या बेस व्हेरिएंटची किंमत १.२२ लाख रुपये इतकी होती. म्हणजेच आता ग्राहक या स्कूटरचे केवळ प्रीमियम एडिशनच खरेदी करू शकतात.
कंपनीने बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. जी 3.8kW इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे. या पॉवरफुल बॅटरी आणि मोटरच्या जोरावर ही इलेक्ट्रिक स्कूटर ५.५ पीएस पॉवर जनरेट करू शकते. ही स्कूटर इको मोडवर ९५ किमी आणि स्पोर्ट मोडवर ८५ किमीपर्यंतची रेंज देते. या स्कूटरसह दिल्या जाणाऱ्या 5Amp आउटलेटद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर १०० टक्के चार्जिंगसाठी ५ तास लागतात.
चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये १२ इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही ट्युबलेस टायर्स आहेत. तसेच या स्कूटरच्या फ्रंट-व्हीलला लीडिंग-लिंक प्रकारचं सस्पेन्शन दिलं आहे. तर बॅक व्हीलला (मागच्या चाकाला) मोनोशॉक सस्पेन्शन दिलं आहे. या स्कूटरला रिव्हर्स गियरही देण्यात आला आहे.
Bajaj चेतक ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती