Bank Holiday in June 2024: बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते पुढच्या आठवड्यात लगेच पूर्ण करा. आता मे महिना संपत आला आहे. त्यानंतर जून महिना सुरू होईल. जून महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्या असणार आहेत.
अशा स्थितीत तुमचे महत्त्वाचे काम अडकू शकते. दर आठवड्याच्या रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते.
बँकेच्या सुट्ट्यांची जाहीर यादी येथे पहा
‘या’ दिवशी बँका बंद राहतील
- 2 जून रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील
- 8 जून रोजी दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद आहेत
- 9 जून रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत
- 16 जून रोजी रविवार असल्याने बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल.
- 17 जूनला बकरीदनिमित्त बँका बंद राहणार आहेत
- 22 जूनला चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असेल.
- रविवार असल्यामुळे 23 जून रोजी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
- रविवार असल्यामुळे 30 जून रोजी बँका बंद राहणार आहेत.
ऑनलाईन काम पूर्ण करा