Bengaluru Video : चालत्या गाडीच्या सनरूफमधून डोकं बाहेर काढलं, ओव्हरहेड बॅरियरला मुलाचं डोकं आदळलं, अन्…; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Bengaluru Viral Video : बंगळुरूमधील एक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, एका मुलाचा निरागसपणा काही क्षणातच गंभीर अपघातात कसा बदलतो, हे या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. व्हिडीओमध्ये एक मुलगा चालत्या गाडीच्या सनरूफमधून डोकं बाहेर काढताना दिसतो.
गाडी पुढे जात असताना, अचानक वर असलेल्या लोखंडी अडथळ्याला त्याचं डोकं जोरात आपटतं, आणि तो आत कोसळतो. हा प्रसंग पाहून प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारानंतर वाहतूक अधिकाऱ्यांनी प्रवास करताना अशा निष्काळजीपणाच्या कृती टाळण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, छोट्याशा मजेमध्ये दडलेला धोका कधीही जीवघेणा ठरू शकतो. हा व्हिडीओ सर्वांसाठी एक कडवट शिकवण देणारा आहे. क्षणिक आनंदासाठी घेतलेला धोका किती भयंकर परिणाम करू शकतो, याचे हे वास्तव चित्रण आहे.