Best Selling SUV Car in India: भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही कार्सची मागणी वाढली आहे. ग्राहकांची ही मागणी पाहता अनेक कंपन्यांनी सात लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत SUV लाँच केल्या आहेत.
भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार देखील ‘टाटा पंच’ नावाची परवडणारी मायक्रो एसयूव्ही आहे. तथापि, आणखी एका नवीन एसयूव्हीला या सेगमेंटमध्ये खूप पसंत केलं जात आहे. या कारचे फीचर्स, किंमत, डिझाईन लुक यामुळे देशातील बाजारपेठेत ह्युंदाईच्या एका कारचा बोलबाला पाहायला मिळतोय.
हेही वाचा : बाकी कंपन्यांची उडाली झोप, आता Royal Enfield इलेक्ट्रिक बुलेट, आली पाहा होणार दाखल?
आम्ही तुम्हाला ज्या कारबद्दल सांगत आहोत, ती कार Hyundai Exter आहे. ऑटो मार्केटमध्ये Hyundai च्या Hyundai Exter एसयूव्हीला मोठी मागणी असून Hyundai च्या लाइनअपमध्ये Exter खूप लोकप्रिय झाले आहे. आता Exter ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने Exter Night Edition लाँच केलं आहे.
गाडी पार्क करायला गेली तरुणी अन व्हिडीओ झाला व्हायरल पाहून नेटकरी म्हणाले
Hyundai Exter या कारमध्ये काय आहे खास?
Hyundai Exter मध्ये ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह ४.२-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आहे. कारच्या मानक वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल डॅशकॅम, ६ एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, टीपीएमएस, थ्री पॉइंट सीटबेल्ट यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे जे सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. ही कार ६० हून अधिक कनेक्ट केलेल्या कार वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV आहे.
किंमत किती?
Hyundai Exter ही कार EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) या सात प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनी या SUV वर तीन वर्षांची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी देत आहे. सात वर्षांच्या विस्तारित वॉरंटीचा पर्याय देखील आहे. ही मायक्रो एसयूव्ही ६ मोनोटोन आणि ३ ड्युअल टोन एक्सटीरियर पेंट्समध्ये उपलब्ध आहे. Hyundai Exeter च्या किंमत ६ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून १० लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत सुरू होतात.
स्वस्तात कार खरेदीची सुवर्ण संधी पहा किंमत फक्त एवढी एव्हरेज 27 कमी