Krishna motivational quotes :श्री कृष्णाने दुःखाला सर्वश्रेष्ठ मित्र का म्हटले आहे? काय आहे गीतेची शिकवण जाणून घ्या.

Krishna motivational quotes : नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात भगवत गीता हा पवित्र ग्रंथ मानला जातो. भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. शिवाय जीवनाचं सार सांगितलं आहे.

गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे. असे म्हटले जाते की, भगवत गीता ही माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेमध्ये दिलेली वचने ही मानवी जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते अशी श्रद्धा आहे.

असे मानले जाते की, गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानसाला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतो. गीतेमधून मानवाला जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देण्यात आले आहेत. भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हीसाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे. असे म्हटले जाते की, गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे. गीतेतील तत्वज्ञाने पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. गीतेत श्रीकृष्णाने दु:खाला सर्वात चांगला मित्र म्हटले आहे. त्याचे कारण देखील गीतेत देण्यात आले आहे. आज देखील अनेक लोक गीतेतील शिकवण अंगीकारून जीवन जगत आहेत. गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन समृद्ध होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

गीतेची शिकवण

  • गीतेमध्ये श्रीकृष्णाने दु:ख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे. कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते.
  • प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते. पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते.
  • गीतेनुसार सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही.
  • श्रीकृष्ण म्हणतात की, फक्त भित्रे आणि दुर्बल लोकच गोष्टी नशिबावर सोडतात. पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात.
  • गीतेनुसार, केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो.
  • कोणाच्या सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना ध्येय. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे.

Fertilizer subsidy; शेतकऱ्यांना खुशखबर; केंद्राने केली खत अनुदानात वाढ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!