मुंबई : महाराष्ट्रात आणि देशात गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या रहिवाशी असल्याचा मुद्दा चर्चेत असून घुसकोरी करुन हे भारतात राहत आहेत. त्यात, विशेषत: मुंबईत अनेक ठिकाणी पोलिसांच्या कारवाई बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
जन्म-मृत्यू नोंदणीसाठी 1 वर्षांपेक्षा अधिक काळ असल्यास सबळ पुरावे आवश्यक
ज्यांचा जन्म अथवा मृत्यू होऊन एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल व त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्रे पाहिजे असतील आणि त्याबाबतचे सबळ पुरावे नसतील अशा अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल. जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम,1969 मधील तरतूदीनुसार तसेच महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम, 2000 नुसार एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म-मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणच्या नोंदी तपासून प्रमाणपत्र दिले जाईल.