या भरतीसाठी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रतेच्या अटी लागू करण्यात आल्या आहेत.
चला तर मग, या भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घेऊया. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट (https://bankofmaharashtra.in) ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे.
अधिकृत अधिसूचनेतील महत्त्वाचे मुद्दे
बँकेने स्पष्ट केले आहे की, उमेदवारांनी नोकरीच्या ठिकाणी सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे. भविष्यात कामकाजासंदर्भात कोणतीही तक्रार आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी, पात्रता निकष पूर्ण आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे.
महत्वाचे
- अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात.
- अर्जदारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्व तपशील तपासावेत.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे
- 10वी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
- 12वी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
- डिप्लोमा प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)
- पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- व्यावसायिक पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- अतिरिक्त आवश्यक प्रमाणपत्रे (निकषांनुसार)
रिक्त पदे आणि वेतनश्रेणी
पद | स्केल | वेतनश्रेणी (रुपये) |
महाव्यवस्थापक – आयबीयू | स्केल VII | 1,56,500 – 1,73,860 |
उपमहाव्यवस्थापक – आयबीयू | स्केल VI | 1,40,500 – 1,56,500 |
सहाय्यक महाव्यवस्थापक – | स्केल V | 1,20,940 – 1,35,020 |
सहाय्यक महाव्यवस्थापक – ट्रेझरी | स्केल V | 1,20,940 – 1,35,020 |
सहाय्यक महाव्यवस्थापक – अनुपालन | स्केल V | 1,20,940 – 1,35,020 |
सहाय्यक महाव्यवस्थापक – क्रेडिट | स्केल V | 1,20,940 – 1,35,020 |
मुख्य व्यवस्थापक – फॉरेक्स/क्रेडिट/ट्रेड फायनान्स | स्केल IV | 1,02,300 – 1,20,940 |
मुख्य व्यवस्थापक – अनुपालन/जोखीम व्यवस्थापन | स्केल IV | 1,02,300 – 1,20,940 |
मुख्य व्यवस्थापक – कायदेशीर | स्केल IV | 1,02,300 – 1,20,940 |
वरिष्ठ व्यवस्थापक – व्यवसाय विकास | स्केल III | 85,920 – 1,05,280 |
वरिष्ठ व्यवस्थापक – बॅक ऑफिस ऑपरेशन्स | स्केल III | 85,920 – 1,05,280 |
अर्ज शुल्क:
- सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी: ₹1180
- SC / ST / PWD: ₹118
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025: अर्ज कसा कराल?
- बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – bankofmaharashtra.in (https://bankofmaharashtra.in)
- भरतीसंबंधी लिंक शोधा आणि नोंदणी करा
- अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क भरा
- फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढा
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर, तो मागे घेता येणार नाही आणि अर्ज शुल्क परत केले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.
अर्ज प्रक्रिया; संपूर्ण जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट :
https://bankofmaharashtra.in