Viral Video : हल्ली सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक मर्यादा ओलांडताना दिसतात. काही लाइक्स, शेअर्स आणि व्ह्यूजसाठी लोकं जीव धोक्यात घालताना दिसतात. अनेकदा धावत्या ट्रेनसमोर काही जण रील्स बनवताना दिसतात.
या प्रकरणावर जीआरपीचे निरीक्षक अरविंद पांडे यांनी सांगितले की, संबंधित व्हायरल व्हिडीओतील आरोपी तरुणाविरुद्ध रेल्वे ट्रॅकमध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. भविष्यात जर कोणी रेल्वे ट्रॅकमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसेच सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तरुणांनी अशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालू नये, अन्यथा याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.