राज्य सरकारच्या विविध सेवा व्हॉटस्ॲपवर; भ्रष्टाचार नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा; सहकार विभागाच्या सेवाही ऑनलाईन
वडिलोपार्जित जमीन प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार कोणाला आहे? जाणून घ्या कायदा नियम काय सांगतो?
मजूर संस्थांमध्ये अध्यक्ष हा मजूरच असला पाहिजे. मात्र राज्यातील मजूर संस्थांचे अध्यक्ष मर्सिडीज गाडीतून फिरत आहेत. त्यामुळे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व कामगार विभागाकडून अधिक प्रभावी नियमावली तयार करण्यात येऊन संस्थांचा दुरुपयोग थांबविला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. लाच घेणारे व भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येते. मात्र सध्याची कार्यपद्धती वेळखाऊ असल्याने यामध्ये सुधारणा करण्यात येऊन नवीन कार्यपद्धती तयार करण्यात येईल. यामुळे विभागीय चौकशी निश्चितच वेगाने पूर्ण होऊन प्रकरण लवकर निकाली निघेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
वेळेत दोषारोपपत्र शक्य सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अंतर्गत विभागीय चौकशी विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी काम सुरू आहे. ही चौकशी गतीने पूर्ण करण्यासाठी व्यवस्था निर्माण करायची गरज भासल्यास ती करण्यात येईल. वेळेत दोषारोपपत्र तयार करणे यामुळे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वायरल व्हिडीओ पाहून नेटकरी बिघडले तुम्हीही डोक्याला हात लावाल