शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय? की, ‘या’ महिन्यात देशांतर्गत कापसाचे दर जाणार 10 हजार पार, तज्ज्ञांच्या मते
Cotton Market Price : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. कापूस दरात वाढ होण्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. खरं पाहता, मागच्या वर्षात सर्वात अधिक दर म्हणून 14000 ची नोंद झाली. आता कापसाचा हंगाम सुरू होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यापैकी सुरुवातीचे तीन महिने दरात लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाली. मुहूर्ताच्या कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटल ते 14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाला.
मात्र हा दर जास्त काळ टिकला नाही. मध्यंतरी कापसाला 9 हजाराचा सरासरी दर मिळत होता. दरम्यान डिसेंबर महिन्यात कापसाचा बाजार सर्वाधिक मंदीत आला. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कापसाला मात्र साडेसात हजाराचा दर मिळाला. डिसेंबर महिन्यात झालेली ही पडझड शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरली.
आजचा कापूस बाजारभाव बजारसमिती नुसार दर पाहण्यासाठी
👉 यावर क्लिक करा
यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र दरात उल्लेखनीय अशी वाढ झाली. अकोट सारख्या बाजारात 9000 चा दर मिळाला. मात्र, ही परिस्थिती ही अधिक काळ टिकू शकली नाही. पहिला आठवडा वगळला तर आता जवळपास संपूर्ण एक महिना कापूस दरात मंदी आली आहे. खानदेश मधल्या यावलसारख्या बाजारात साडेसात हजार रुपयाचा दर कापसाला मिळत आहे.
फक्त खानदेशच नाही तर मराठवाडा आणि विदर्भात देखील कापूस दर दबावात आहेत. सरासरी आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव आहेत. यामुळे सध्या मिळत असलेला दर शेतकऱ्यांसाठी निश्चितच परवडणारा नसल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कापूस दर तेजीत आले आहेत. खरं पाहता भारतीय कापूस महाग-भारतीय कापूस महाग अशी रट लावली जात होती.
मात्र आता जागतिक बाजारातील कापूस भारतीय कापूस पेक्षा महाग बनला आहे. दरम्यान आता कापसाचे वायदे देखील देशांतर्गत सुरू होणार आहेत. शिवाय चीन आणि पाकिस्तान या दोन प्रमुख देशांमधून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कापसाचे दर कमी झाले असल्याने देशांतर्गत कापसाची आवक देखील मोठी कमी झाली आहे.
अशा परिस्थितीतही देशातील कापुस बाजार दबावत असल्याचे चित्र असून काल साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचे दर देशांतर्गत नमूद करण्यात आलेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमीच दरात कापसाचे सौदे झालेत. मात्र, आता दरात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
आजचा कापूस बाजारभाव बजारसमिती नुसार दर पाहण्यासाठी
👉 यावर क्लिक करा
अशाच नवनवीन अपडेट्स वाचा येथे क्लिक करा
माहिती आवडल्यास खालील शेअर बटनवरुन इतरांना देखील शेअर करा