Cotton, Soybean Bharpai : कापूस, सोयाबीन मदत यादीत नाव नसेल तर काय करावे? नाव नसेल तर अनुदान मिळणार का?
तसेच काही शेतकऱ्यांनी सांगितले की, आम्ही मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीकं घेतली होती. पण फक्त कापूस पिकाच्या यादीत नाव आले सोयाबीनच्या यादीत नाव नाही आले. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, सोयाबीन पिकाच्या यादीत नाव आले कापसाच्या यादीत नाव नाही आले. म्हणजेच दोन्ही पिकांची ई-पीक पाहणी करूनही एकाच पिकासाठी पात्र ठरवण्यात आले. मग आम्हाला एकाच पिकासाठी मदत मिळणार की नवी यादी येणार?
तसेच जर शेतकरी सांगतात त्या प्रमाणे ई-पीक पाहणी करूनही यादीत शेतकऱ्यांचे नाव नाही. तसेच कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीकं असताना एकाच पिकाच्या यादीत नाव असेल तर शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे संपर्क साधावा. महसूल विभाग नेमकी अडचण सांगू शकतील. जर शेतकऱ्यांची ही अडचण असेल तर महसूल विभाग ई-पीक पाहणीच्या नोंदी पुन्हा तपासतील आणि तशी सुधारित यादी देतील. किंवा काही तांत्रिक कारणाने शेतकऱ्यांची माहीती मिळत नसेल तर महसूल विभागाने या शेतकऱ्यांनी विशिष्ट पिकांची ई-पीक पाहणी केली होती, असे सुचविले तरी या शेतकऱ्यांचा समावेश मदतीसाठी पात्र ठऱलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत केला जाईल, असेही कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
म्हणजेच काय, जर तुमचे नाव यादीत नसेल किंवा एकाच पिकाच्या यादीत असेल तर तुम्ही तलाठ्यांकडे यासंबंधीची तक्रार करून तुमचे नाव यादीत समाविष्ठ करण्याची सूचना करावी लागेल.
E pik pahani ई पीक पाहणी अशी करा मोबाईल वर
आधार संमतीपत्राविषयी कृषी आयुक्तालयाने सांगितले की, पीकविमा आणि एनडीआरएफची मदत शेतकऱ्यांना मागच्या काही वर्षांपासून मिळत आहे. या योजनांच्या लाभसाठी आधारचा वापर करण्याची संमती सुरवातीला घेतली आहे. नविन योजना आली आणि त्याचे पैसे आधारसंलग्न खात्यात टाकायचे असतील तर आधार वापरचे संमतीपत्र घेणे बंधनकारक असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नोंदी शासनाकडे असल्या तरी योजना नवी असल्याने शेतकऱ्यांकडून संमतीपत्र आणि इतर कागदपत्रे घेतली जात आहेत, असे स्पष्टीकरण कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले.
नुकसानभरपाई यादीत नाव पहा