Bank Loan; अनेकजण पैशांची गरज भागवण्यासाठी बँकेतून कर्ज घेतात. पण, कर्ज मिळवण्यासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. पण, आता तुम्हाला बँकेत जाण्याची किंवा नेट बँकिंगद्वारे लॉग इन करण्याची गरज नाही.

तुम्हाला तुमच्या UPI द्वारे कर्ज मिळेळेल. यासाठी RBIने बँकांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. RBI ने देशातील सर्व बँकांना युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI वर ग्राहकांना प्री-अप्रुव्हड कर्ज देण्यास सांगितले आहे. RBI च्या या निर्णयाचा मुख्य उद्देश UPI पेमेंट सिस्टमची व्याप्ती वाढवणे हा आहे.

UPI ​​ची व्याप्ती वाढेल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले की, सध्या बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट आणि क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले जाऊ शकते. आता त्याची व्याप्ती आणखी वाढवली जात आहे. यूपीआयद्वारे आता क्रेडिट लाइन्सला फंडिंग अकाउंटच्या रुपात सामील करुन याची व्याती वाढवली जात आहे. RBI ने म्हटले की, या सुविधेअंतर्गत UPI प्रणाली वापरुन प्री-अप्रुव्हड कर्ज मिळेल.

बँकेला बोर्डाची मान्यता घ्यावी लागेल
ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी सर्व बँकांना धोरण तयार करून त्यांच्या संचालक मंडळाकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. या पॉलिसी अंतर्गत किती कर्ज दिले जाऊ शकते? ते कोणाला देता येईल? कर्जाचा कालावधी काय असेल? तसेच कर्जावर किती व्याज आकारले जाईल? या सर्व गोष्टींवर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. 6 एप्रिल रोजी केंद्रीय बँकेने आपल्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीत बँकांकडून पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन हस्तांतरित करुन पेमेंट करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला होता. UPI ची व्याप्ती वाढवणे हा त्याचा उद्देश होता.

ऑगस्टमध्ये विक्रमी UPI व्यवहार
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानुसार, UPI ने ऑगस्टमध्ये प्रथमच एका महिन्यात 10 अब्ज व्यवहार पार केले. 30 ऑगस्टपर्यंत UPI ने महिन्यादरम्यान 10.24 अब्ज व्यवहार नोंदवले, ज्याचे मूल्य 15.18 लाख कोटी रुपये आहे. जुलैमध्ये UPI प्लॅटफॉर्मवर 9.96 अब्ज व्यवहार झाले. ऑगस्ट महिन्यात, UPI द्वारे दररोज अंदाजे 330 मिलियन व्यवहार झाले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!