Cryopreservation: मृत व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत झाली तर, ही गोष्ट सध्या अशक्य वाटत असली, तरी एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत करता येईल, असा दावा काही कंपन्या करत आहेत. त्यासाठी मृतदेह दीर्घ काळ गोठवावे लागतील.
या तंत्राला ‘क्रायोनिक्स’ असं नाव देण्यात आलं आहे. मृत्यू झालेल्या व्यक्ती केवळ बेशुद्ध पडल्या आहेत, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
मृतदेह गोठवून सुरक्षित ठेवण्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागते. मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचं काही तंत्र भविष्यात आले तर हे मृतदेह बाहेर काढून पुन्हा जिवंत केले जातील, असा दावा सदर्न क्रायोनिक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने काही काळापूर्वी केला होता.