cyclonic Update : प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रात काय स्थिती? IMD कडून महत्त्वाची अपडेट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची निर्मीती होत आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे.
दहावीच्या निकालाची अपडेट येथे पहा
ताशी 70 किलोमीटर वेगानं हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकण्याची शक्यता असून, त्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काहीप्रमाणात ताडाखा हा राज्याला देखील बसू शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या काळात राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुंदु्र्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा