केंद्र सरकार कडून, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
यामध्ये गट क आणि ब गटातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस (Diwali Bonus) म्हणून एक महिन्याच्या पगाराएवढी रक्कम दिली जाणार आहे.
कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा?
कसा ठरवला जातो बोनस?
कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या आधारावर कमाल मर्यादेनुसार, जी रक्कम कमी असले, त्या आधारावर बोनस जोडला जातो. 30 दिवसांचा मासिक बोनस सुमारे एक महिन्याच्या पगाराइतका असेल. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, जर एखाद्या कर्मचाऱ्याला 18000 रुपये मिळत असतील, तर त्याचा 30 दिवसांचा मासिक बोनस अंदाजे 17,763 रुपये असेल. कॅलक्युलेशननुसार, रु 7000*30/30.4 = रु. 17,763.15 (रु. 17,763).
मोदी सरकारकडून बोनस जाहीर
पुढील महिन्यात दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (अॅड-हॉक बोनस) देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी (नॉन-राजपत्रित कर्मचारी), जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांनाही हा बोनस दिला जाईल. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.
Diwali Bonus 2023 : मोठी बातमी! केंद्र सरकारची दिवाळी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर