E-pick pahani ‘ई-पीक नोंदणी’ कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Register E-pick | शेतकऱ्यांच्या पिकाची नोंदणी अचूक व्हावी यासाठी महसूल ‘ई-पीक पाहणी’ सेवा सुरू झाली. शेतकऱ्यांची शेतजमीन ही पडीक आहे की लागवडी स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांनी शेतजमिनीत कोणते पिक किती क्षेत्रामध्ये घेतले आहे.
या सर्व बाबींची माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलद, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे. तसेच, आता मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या पिकांची माहिती अक्षांश-रेखांश दर्शवणाऱ्या पिकांच्या छायाचित्रासह पाहता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ई पिक नोंदणी (How To Register E-pick) कशी करावी.
👉’ई-पीक’ नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
‘ई-पीक’ नोंदणी व पाहणी कशी करावी?
सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये ‘ई-पिक पाहणी’ व्हर्जन-2 हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरच्या माध्यमातून डाऊनलोड करून घ्यावे.
‘ई-पिक पाहणी’ ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईल नंबरची नोंद करून घ्यावी.
इतर नोंदणी करणाऱ्या व्यक्तीस स्वतःचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करून गट क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी.
यानंतर, पुन्हा होम पेजवर येऊन स्वतःच्या शेतामधील पिकाची माहिती भरून खाते क्रमांक निवडावा.
पुढे गट क्रमांक निवडून जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे. याची माहिती भरून घ्यावी.
कोणत्या हंगामातील पीक आहे, कोणते पीक घेतलेले आहे आणि पिकाचा वर्ग कोणता आहे निवडावे. तसेच, एका पेक्षा जास्त पीक असेल तर बहुपीक पर्याय निवडावा.
• यानंतर सिंचन पद्धत, लागवड केलेली दिनांक आणि स्वतःच्या जमिनीमध्ये उभे राहून आपल्या मोबाईल मध्ये असलेले जीपीएस ऑन करून शेतीचा फोटो काढून अपलोड करावा.