Maharashtra Assembly Election: मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ७२ तासांची मुदत देण्यात आली आहे. केंद्रात मंत्रीपद अथवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ॲाफर एकनाथ शिंदे यांना देण्यात आली.

दोन्हीपैकी एकाची निवड करा अशी एकनाथ शिंदे यांना भाजप पक्षश्रेष्टींची सुचना आहे. शुक्रवारी भाजपचे २ केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल होणार आहेत. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदे यांचही नाव चर्चेत आहे.

दुसरीकडे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर एक नवी गुगली टाकल्याने भाजपची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या दोन्ही ऑफर नाकरल्या आहेत. द इंडियन न्यू एक्सप्रेसच्या माहितीनुसार भाजपने एकनाथ शिंदे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी दोन्ही पर्याय नाकारले आहेत. त्याऐवजी, शिंदे यांनी मागणी केली की जर त्यांना मुख्यमंत्रिपद दिले गेले नाही, तर महायुती सरकारचे संयोजक बनवावे. शिवाय, त्यांच्या सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावे, अशी अट भाजपपुढे ठेवली आहे.

शिंदेंच्या कामगिरीमुळे विजय

शिवसेना नेते रामदास कदम यांनी महायुतीच्या विजयामागे एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान असल्याचा दावा केला. कदम म्हणाले, “या ऐतिहासिक विजयात भाजपने १५० पैकी १३२ जागा जिंकल्या, तर शिवसेनेने ७९ पैकी ५७ जागा जिंकल्या. अशा स्थितीत शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची दुसरी संधी मिळायला हवी. भाजपने जर त्यांना डावलले, तर हा चुकीचा संदेश जाईल.”

अजित पवारांचा हस्तक्षेप

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस यांना पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेची भूमिका कमकुवत झाली असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला. “राष्ट्रवादीने भाजपशी योग्य सल्लामसलत न करता पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे,” असे ते म्हणाले.

त्यांना काही समजत का? विषय सत्ताधारी-विरोधक यांच्यातील नाहीच? D Y Chandrachud विरोधकांच्या निशाण्यावर का?

 

 

भाजपसमोर संकट

मुख्यमंत्री पदाचा पेच भाजपने जर शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले नाही, तर उद्धव ठाकरे यांना राजकीय भांडवल मिळण्याची शक्यता आहे. “ठाकरे यांचा दावा असेल की शिंदेंना वापरून भाजपने मोठा विजय मिळवला, मात्र नंतर त्यांना दूर केले. शिवाय, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांआधी ठाकरे यांना याचा फायदा होईल,” असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.

शपथविधी समारोह लांबणीवर

मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या या तिढ्यामुळे शपथविधी समारोह उशिरा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता हा सोहळा २९ नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात परत जाऊन मतदारांचे आभार मानण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय, कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra Assembly Election Result: महायुतीच्या महाविजयात वारकरी आणि किर्तनकारांचेही मोठे योगदान, ‘एक है तो सेफ है’ मुळे टळले मतविभाजन

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!