farm crop mortgage: शेतकरी शेतपिकांचे उत्पादन घेतल्या नंतर विक्री करण्यासाठी घाई करतात ज्याआर्थी अपार कष्ट करून उत्पादन घेतल्यानंतर मोबदला देखील मिळालाच पाहिजे परंतु जर शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी नेला तर चांगला बाजारभाव मिळतो असं आपण अनेकदा अनुभवलं देखील असेल. आपण शेतमालाची विक्री करतो आणि काही काळानंतर त्याच चांगला प्रतिसाद बाजारपेठेत पाहायला मिळतो. म्हणूनच शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या हेतूने कृषि पणन मंडळ सन १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
👉कर्ज कसे घ्यावे त्यासाठी काय प्रक्रिया आहे येथे पहा
शेतमालाच्या काढणीनंतर बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ (Maharashtra State Board of Agriculture Marketing) राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहे. कर्ज कसे दिले जाते आणि योजनेचे स्वरूप कसे आहे? याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.
👉कर्ज कसे घ्यावे त्यासाठी काय प्रक्रिया आहे येथे पहा
शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामामध्ये तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत 6 टक्के व्याजदराने सहा महिने कालावधीसाठी कर्ज त्वरित उपलब्ध होते. बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतकऱ्यांचे शेतमालासाठी गोदाम भाडे विमा देखरेख खर्च अधिक खर्चाची जबाबदारी बाजार समितीवर असल्याने शेतकऱ्यांना (farmers) भुरदंड बसत नाही.
सहा महिन्याच्या आत कर्ज परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याज सवलत मिळते. स्वनिधीतून तारण कर्ज राबवणाऱ्या बाजार समित्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रकमेवर तीन टक्के व्याज सवलत तसेच अनुदान स्वरूपात मिळते.
👉कर्ज कसे घ्यावे त्यासाठी काय प्रक्रिया आहे येथे पहा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) तसेच कृषी पणन मंडळाची विभागीय कार्यालय येरवडा पुणे 6 येथे प्रत्यक्ष dsopune6@gmail.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
👉आता शेतकऱ्यांची बांध कोराकोरी बंद! 1 जुलैपासून होणार ‘सॅटेलाईट’ जमीन मोजणी