Farmer ID :शेतकरी ओळखपत्र मिळण्यास सुरवात! मोबाईलवरून कसं डाऊनलोड करायचे?

Agriculture News : राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली असून, आता त्यांना त्यांच्या युनिक आयडीचे अधिकृत संदेश येवू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आता ‘फार्मर आयडी कार्ड’ कसे डाउनलोड करायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली असून, आता त्यांना त्यांच्या युनिक आयडीचे अधिकृत संदेश येवू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आता ‘फार्मर आयडी कार्ड’ कसे डाउनलोड करायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे. चला तर मग या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेऊया.

 

फार्मर आयडी PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय?

राज्य सरकारने ‘अग्रिस्टॅक योजने’अंतर्गत फार्मर आयडी कार्ड सुरू केले आहे. या कार्डामार्फत शेतकऱ्याची जमीन माहिती, पिकांचे उत्पादन, बाजारभाव, मालकी हक्क, आणि इतर शेतीसंबंधित माहिती एका ठिकाणी संकलित केली जाईल. हे कार्ड भविष्यातील कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरणार आहे.

 

फार्मर आयडी कसा डाउनलोड कराल?

सर्वप्रथम https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. नंतर आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा. जर आपण यापूर्वी नोंदणी केलेली असेल, तर आधार क्रमांक टाकताच आपली नोंदणी माहिती आणि युनिक फार्मर आयडी स्क्रीनवर दिसेल. सध्या यामध्ये दुरुस्तीचा पर्याय नाही, त्यामुळे आधी दिलेली माहितीच दाखवली जाईल.

 

फार्मर आयडी PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

फार्मर आयडी PDF कशी डाऊनलोड करावी?

पुढे जाऊन स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘View Details’ या पर्यायावर क्लिक करा. तुमची संपूर्ण माहिती समोर दिसेल. तुम्हाला वरील बाजूस ‘Generate PDF’ किंवा ‘Download PDF’ असा पर्याय दिसेल.

‘Download PDF’ या पर्यायावर क्लिक करून तुमचे कार्ड डाउनलोड करा आणि आवश्यक असल्यास प्रिंट काढा.

 

Home 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!